अहमदनगर – अहमदनगरमध्ये भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे संगमनेरमध्ये संतप्त वातावरण निर्माण झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत ठिय्या आंदोलन केले आणि गाड्यांची जाळपोळ केली.
या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. जयश्री थोरात, डॉ. सुधीर तांबे आणि दुर्गा तांबे यांच्यासह कार्यकर्त्यांनी ८ तास ठिय्या देत आक्रमक भूमिका घेतली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले गेले, मात्र पोलिसांच्या विलंबामुळे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.