सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील कणकवली-देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना – भाजपा – राष्ट्रवादी आणि रीपाई ( आठवले ) महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार नितेश राणे यांनी आज वाजत गाजत मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी शहरातून रॅली काढली. त्यांनतर झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेला अलोट गर्दी लोटली होती. याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे, सौ.नीलमताई राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुडाळ मालवणचे उमेदवार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपनेते संजय आंग्रे, आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.