नाशिक : भाजपाच्या वतीने कोठेही घराणेशाहीचा उपयोग केला नाही असे स्पष्ट करून भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे म्हणाले की कोणी कोणाशी गद्दारी केली हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचे उत्तर या निवडणुकीमध्ये मतदार देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे हे नाशिक दौऱ्यावरती आलेले होते नाशिक मधील भाजपचे उमेदवार आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलण्यासाठी ते भाजपच्या मीडिया सेंटरमध्ये आले होते.
पत्रकारांशी बोलताना विनोद तावडे म्हणाले की, भाजपावरती घराणेशाहीचा आरोप जो केला जात आहे, तो अतिशय चुकीचा आहे. भाजपाने कुठली घराणेशाही केली, हे आरोप करणाऱ्यांनी एकदा तरी दाखवून द्यावे. घराणेशाही म्हणजे काय तर एक घर परंपरेनुसार पक्ष चालवतो, त्याला घराणेशाही म्हणतात. भाजपामध्ये कोणत्या घराणे पक्ष चालवला तर नाही हे चुकीचे आहे. तसं असतं तर मोदी त्यांच्या घरातील परिवारातला घेऊन पक्ष चालू शकले असते, पण तसं भाजपामध्ये होत नाही. विनाकारण भाजपच्या विरोधात आरोप करणं हे विरोधकांचे काम आहे आणि ते घराणेशाहीचा आरोप जो करता आहे तो चुकीचा आहे.
गद्दारी केली असे आरोप आमच्यावरती केले जातात पण खरी गद्दारी कोणी केली याचा आत्मपरीक्षण आपण एकदा केलं पाहिजे असा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नाव न घेता राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे पुढे म्हणाले की या सर्व बाबींचा आत्मचिंतन केलं गेलं पाहिजे कारण आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी जी गद्दारी भाजपा बरोबर झाली आहे ती कदापि सहन केली नसती अशी गद्दारी करणाऱ्यांचा त्यांनी कडेलोटच केला असता असे सांगून ते पुढे म्हणाले की तुमच्या पक्षात नाराजी होती त्या नाराजीला वाट मिळाली आणि त्या आमच्याकडे आले म्हणून तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गद्दारीचा आरोप करणार का असा प्रश्न उपस्थित करून व आपण काय केलं ज्याचं ही आत्मचिंतन एकदा केलं गेलं पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये खरी गद्दारी कोणी केली का केली कशी केली या सर्व बाबी मतदारांना माहिती आहे त्यामुळे मतदार अशा गद्दारांना योग्य तो धडा शिकवतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील जनता ही सुजन आहे ती नक्कीच महायुतीचे उमेदवार निवडून देईल यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नसल्याचे ते म्हणाले
सध्या रोज सकाळी नऊ वाजता बांग दिली जाते आता यावर उत्तर देण्याची व्यवस्था भाजपा ने केलेली आहे आणि जी खरी माहिती आहे ती सर्वांसमोर पक्ष नक्कीच आणणार आहे असे सांगून जनतेमध्ये चुकीचा समज निर्माण केला जातो तो थांबविण्यासाठी आता काम सुरू झालेले आहे. पक्षाने आतापर्यंत 146 उमेदवारांची यादी घोषित केली आहे आणि ज्या ठिकाणी पक्षामध्ये बंडखोरी झाली आहे अशा बंडखोरांना देखील शांत केले जाणार आहे त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे असेही त्यांनी सांगितले .