मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0

ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाच्यावतीने महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसैनिक तसेच महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह यावेळी, मुख्यमंत्र्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी आवर्जून मुख्यमंत्री शिंदेंच्या अर्ज भरतानाच्या मिरवणुकीत सहभागी होत विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ठाणे शहरातील महायुतीचे तीनही उमेदवार विजयी करत या शहरावर विजयाचा भगवा पुन्हा फडकवण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. येथील मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होत असून शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर, मनसेकडूनही येथील मतदारसंघात उमेदवार उतरविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या 29 ऑक्टोबर रोजी अंतिम मुदत आहे. त्यामुळे, आज मोठ्या प्रमाणात राजकीय पक्षांच्या व मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरुन निवडणुकीच्या मैदानात अधिकृतपणे शडडू ठोकला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech