कासारगोडा : केरळच्या कासारगोडा येथे एका मंदिरात झालेल्या दीपोत्सवात फटाक्यांच्या स्फोटात 150 जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासंदर्भातील माहितीनुसार अंजुतांबलम वीरकावू वार्षिक कालियाट्टम उत्सव साजरा केला जात होता. कार्यक्रमासाठी फटाक्यांची ऑर्डर देण्यात आली होती. ते एका स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवले होते. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीनंतर 12.30 वाजता अचानक फटाके फुटू लागले आणि काही वेळातच आगीसह धुराचे लोट उसळले. स्फोटामुळे 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यातील 97 जखमींना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.