पुणे – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने आज, गुरुवारी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. पक्षातील प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रकाश आंबेडकरांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या ह्रुदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील ३ ते ५ दिवस ते रुग्णालयात असतील.राज्यात विधानसभा निवडणुकांचा गाजावाजा सुरू आहे. निवडणूकीच्या तोंडावर प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती बिघडली आहे. मंगळवारी २९ ऑक्टोबरला वंचितच्या उमेवदारांची नववी यादी जाहीर झाली करण्यात आली. या यादीत एकूण 39 जागांसाठी वंचितने उमेदवार दिले आहेत.