दिव्यदृष्टी संस्थेचे कार्य दिव्यांगांसाठी प्रेरक ठरणार – पद्मश्री पोपटराव पवार

0

अहमदनगर : अंध व दिव्यांग हे स्वतः च्या पायावर उभे राहून समाजात सकारात्मक संदेश देत आहेत.सीएसआर च्या माध्यमातून अनेक सामाजिक संस्था कडून विविध उपक्रम राबविले जात आहेत.दिव्य दृष्टीच्या कामाला जनाधार आणि सीएसआर मिळाला तर अल्पावधीतच नगर शहर व जिल्ह्यातील दिव्यांग यांना प्रेरक ठरणार आहे,असे प्रतिपादन आदर्श गाव चळवळीचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

ते दिव्य दृष्टी संस्थेच्या वतीने आयोजित दीपोत्सव अंतर्गत स्वरदिपावली या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.नगर शहरातील माऊली संकुलात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पोपटराव पवार आपल्या मनोगतातत पुढे म्हणाले की,दिव्य दृष्टी संस्थेचे दिव्यांग आगामी काळात दिव्यांग पुनर्वसनाचे विविध प्रकल्प सुरू करीत आहेत.यासाठी मी स्वतः सीएसआर मधून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार म्हणाले.

रेडिओ सिटी ९०.१ एफ एम हे या स्वर दिपावली कार्यक्रमाचे रेडिओ पार्टनर होते.या कार्यक्रमा त दिव्य दृष्टीचे अध्यक्ष कृष्णा तवले यांनी आपल्या प्रास्ताविकात दिव्यांग यांना एकत्र करून भविष्यात मूलभूत शिक्षणाचे विविध प्रकल्प दिव्य दृष्टी संस्था सुरू करणार असल्याचा संकल्प उपस्थित यांना सांगितला.कृष्णा तवले व सुभाष शिंदे यांनी दिव्य दृष्टीच्या मदत केलेल्या सर्व प्रायोजक आणि दात्यांचे आभार मानले.स्वर आले दुरुनी ते सुर निरागस हो या गाण्यांनी स्वर दिपावली मैफिल रंगली.अंध गायक निलेश शहादेव शिंदे,सुहास नरवडे,वर्षा पड्याळ,अलका शिंदे,सौदागर लोंढे,अंकुश जाधव,सलीम आतार या कलाकार यांच्या गायन वादनाने सर्व उपस्थित नगरकर यांची संगीत दिवाळी साजरी केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech