भंडारा – भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी गावात दिवाळी निमित्त अनोखी परंपरा जपली जाते. गावातील मुलीचा लग्न झालं तर पहिल्या दिवाळीत जावई मुलीचा सत्कार करण्यात येतो. सोनी गावात भाऊ बीजेच्या दिवशी भाऊ ओवाळी करिता मुलगी जावई गावात येतात. तर पहिल्यांदा जावई गावी आल्यावर संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने जवयांचा शाल श्रफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. ही परंपरा गेली अनेक दशकापासून अविरतपणे सुरूच आहे.