भाजपला हादरा; माजी खासदार हिना गावितांकडून बंडखोरी, भाजपला सोडचिठ्ठी

0

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. नंदुरबारच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. हिना गावित यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्ह्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या माजी खासदार तसेच भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर पक्षाला रामराम ठोकला आहे. प्राथमिक सदस्य पदासह पक्षाच्या इतर पदांचाही त्यांनी राजीनामा पाठवला आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे. अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून डॉ. हीना गावित अपक्ष निवडणूक लढवत आहेत. अक्कलकुवा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी त्या आग्रही होत्या. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदे गट विरोधात काम करत असल्यामुळे मी अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. मी खासदार असताना अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघात अनेक विकासाचे कामे केलेले आहेत. मी केलेल्या विकास कामांचा फायदा मला मतदार मतदानाच्या स्वरूपात देणार, मी निवडणूक लढत जिंकणार आहे, असेही त्यांनी सांगितले होते. आता डॉ. हिना गावित यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech