लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई – अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचे सांगत सलमान खानला दोन पर्याय दिले आहेत. मुंबई पोलीस वाहतूक नियंत्रण कक्षाला लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा एक मेसेज पाठवण्यात आला असून, त्यात सलमानला ठार मारण्याची धमकी दिली आहे. या मेसेजमुळे सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे आणि मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत. याआधीही सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई हा पंजाबमधील कुख्यात गँगस्टर असून, त्याने सलमान खानविरुद्ध पूर्वीपासून शत्रुत्व ठेवल्याचे वृत्त आहे. सलमानने त्याच्या गँगच्या मागण्या पूर्ण न केल्यास त्याला ठार मारले जाईल, असे बिश्नोईच्या गँगकडून वारंवार धमक्या येत आहेत.

पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळालेल्या या मेसेजमुळे मुंबई पोलिसांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. खास करून निवडणुकीच्या काळात अशा घटनांमुळे सुरक्षेच्या प्रश्नांवर मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत तात्काळ वाढ केली आहे. या मॅसेजमध्ये दोन संदेश देण्यात आले आहेत. सलमानने त्यांच्या मंदिरात जाऊन माफी मागावी किंवा पाच कोटी रुपयांची रक्कम द्यावी; अन्यथा त्याचा जीव घेण्याची धमकी दिली आहे. या धमकीत असेही स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech