आळंदीत कार्तिकी यात्रेची लगबग; प्रशासनाकडून आढावा

0

पुणे : निवडणुकीबरोबरच कार्तिकी यात्रेसाठी आळंदीत येणार्‍या भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी स्थानिक प्रशासन, खेड तहसील, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, पोलिस आयुक्तालय व्यस्त झाले आहे. या यात्रेसाठी आठ लाख भाविक येण्याचा अंदाज आहे.कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. विधानसभा निवडणुकीत प्रशासन व्यस्त असताना कार्तिकी यात्रेमुळे प्रशासनावर दुहेरी ताण येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षेखाली सकाळी अकरा वाजता पालिका टाऊन हॉलमध्ये वारी पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. यात कार्तिकी वारी नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

निवडणूक कार्यक्रमामुळे तहसीलदार ज्योती देवरे, हवेली विभागातील महसूलचे अधिकारी, कर्मचारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी बैठकीला अनुपस्थित होते.सदर बैठकीत पाणीपुरवठा, विद्युत, वाहतूक प्रश्न, पथ विक्रेत्यांची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण कारवाई, कायदा व सुव्यवस्था आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच विभागवार आढावा घेण्यात आला. पोलिस बंदोबस्त व पर्यायी मार्गांचा वापर, याबाबत नियोजन करण्यात आले. शहराच्या वेशीवर चारही बाजूंना पार्किंग व्यवस्था व वाहतूक वळविण्याबाबत चर्चा करण्यात आली. भाविकांच्या सोयीसुविधांबाबत प्राधान्याने उपाययोजना करण्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech