विमानतळांवर ‘इकॉनॉनी झोन’ अनिवार्य, किफायतशीर दरात खाद्यपदार्थ

0

नवी दिल्ली : भारतीय विमान प्राधिकरणाने विमानतळावर इकॉनॉमी झोन अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक विमानतळावर काही जागा इकॉनॉमी झोन म्हणून राखीव असेल. जेथे प्रवाशांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ खरेदी करता येतील. यासंदर्भात विमान प्राधिकरण अधिकाऱ्यांने सांगितले की, या ठिकाणी खाद्यपदार्थ सुमारे ६० ते ७० टक्के स्वस्तात मिळतील. सध्या विमानतळावर एका चहाची किंमत १२५ ते २०० रुपये आहे.परंतु इकॉनॉमी झोनमध्ये केवळ ५० ते ६० रुपये असेल. मात्र या इकॉनॉमिक झोन मध्ये सेवा आणि खाद्यपदार्थांच्या प्रमाणामध्ये फरक असेल. म्हणजे बसण्याऐवजी उभे राहण्यासाठी टेबल असतील. चहा लहान कप किंवा ग्लासेसमध्ये दिला जाईल. पूर्ण जेवणाऐवजी मर्यादित जेवण असेल.

पॅकिंगच्या मूलभूत गुणवत्तेत खाद्य पदार्थ उपलब्ध असतील. गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळावरील महाग खाद्यपदार्थांबाबत तक्रार केली जाते. प्रवाशाला घरातून विमानतळावर पोहोचण्यासाठी आणि नंतर प्रवास पूर्ण करून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी सरासरी ६ ते ७ तास लागतात. विमानतळ आणि विमान या दोन्ही ठिकाणी प्रवाशांना चहा, पाणी किंवा जेवण घेता येते. पण किंमती इतक्या जास्त आहेत की लोक काहीही खाण्यापेक्षा उपाशी राहणे चांगले मानतात. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि कोची विमानतळावरील देशांतर्गत उड्डाणांच्या निर्गमन क्षेत्रात अशी ठिकाणे इकॉनोमिक झोनसाठी निश्चित करण्यात आली आहे. येथे परवडणाऱ्या दरात ६ ते ७ खाद्यपदार्थ दुकाने उघडतील अशी माहिती विमानतळ प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.

नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी गेल्या दोन महिन्यांत ही समस्या सोडवण्यासाठी ३ बैठकी घेतल्या. यामध्ये भारताचे विमान प्राधिकरण, विमानतळ ऑपरेटिंग कंपनी आणि विमानतळावर खाण्यापिण्याची दुकाने चालवणाऱ्या कंपन्यांचा समावेश होता. बैठकीनंतर, असा निर्णय घेण्यात आला की, ज्या विमानतळांवर सध्या बांधकाम सुरू आहे, त्या भागात देशांतर्गत उड्डाणे सुरू असलेल्या भागात बजेट भोजनालय किंवा हलके वेतन क्षेत्र म्हणून एक झोन अनिवार्यपणे विकसित करण्यात यावा.

सध्याच्या विमानतळावरील देशांतर्गत उड्डाण क्षेत्रातही असे झोन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की इकॉनॉमी झोनमध्ये फक्त खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध असेल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या परवडणाऱ्या झोनच्या क्षेत्राबाबत अद्याप कोणतेही नियम ठरलेले नाहीत. विमानतळाचा आकार आणि विमान आणि प्रवाशांच्या संख्येनुसार हे निश्चित केले जाईल. लहान आणि मध्यम विमानतळांवर ६ ते ८ दुकाने सामावून घेण्यासाठी पुरेशी जागा असेल आणि प्रति तास सुमारे २०० प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल. या वर्षी डिसेंबरपर्यंत ३ विमानतळांवर आणि पुढील ६ महिन्यांत प्रत्येक विमानतळावर हे झोन सुरू होतील अशी माहिती सूत्रांनी दिली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech