नवी दिल्ली : गेल्या 17 जून रोजी काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी एअर इंडियाने धर्माच्या आधारावर खाद्यपदार्थांना हलाल अन्न लेबल केल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. टागोर म्हणाले होते की, एअर इंडियाच्या विमानात हिंदू जेवण आणि मुस्लिम जेवण ? यात काय फरक आहे ? नागरी विमान वाहतूक मंत्रालय यावर कारवाई करेल, अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले होते. त्यावर एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये हिंदू आणि शिख प्रवाशांना हलाल अन्न दिले जाणार नाही. तर मुस्लिमांसाठी असलेल्या हलाल प्रमाणित जेवणाला स्पेशल जेवण असे नाव देण्यात आलेय. यापूर्वी हलाल प्रमाणित अन्नाला मुस्लीम जेवण म्हंटल्यामुळे वाद निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी एअर इंडिया विमानातील खाद्यपदार्थांबाबत वादात सापडली होती. याबाबत एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला. एअर इंडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिमांसाठीच्या हलाल प्रमाणित जेवणावर स्पेशल मील (एसपीएमएल) असे स्टीकर लावले जाईल. हलाल प्रमाणपत्र केवळ सौदी क्षेत्रातील सर्व अन्न हलाल असेल. जेद्दाह, दम्माम, रियाध, मदिना सेक्टरसह हज फ्लाइटवर हलाल प्रमाणपत्र दिले जाईल. यापुढे हिंदू, शिख प्रवाशांना हलाल अन्न देणार नसल्याचे एअर इंडिया स्पष्टीकरण दिले आहे.