बीड : राज्याचे कृषीमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं असतं तर बरं झालं असत असं मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या परळी येथे राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी भावनात्मक आवाहन करत, धनंजय मुंडेंना आमदार बनविण्यासाठी जनतेकडे पाठिंबा मागितला. या सभेत त्यांनी असं म्हटलं की, धनंजय मुंडे यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं. यावेळी धनुभाऊला जबरदस्त मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी पंकजा मुंडेंनी जनतेला आवाहन केलं.
यावेळी बोलतांना आमदार पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपचं कमळ लक्षात ठेवा आणि राष्ट्रवादीच्या घड्याळाचं बटण दाबा. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं की, त्यांचं आणि धनंजय मुंडेंचं राजकीय जीवन विरोधात काम करण्यात गेलं, त्यामुळे खूप उर्जा वाया गेली. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की देशात अनेक राजकीय परिवार एकमेकांच्या विरोधात लढत आहेत, मात्र आता या निवडणुकीत आपण एक आहोत हा संदेश द्यायला हवा. राजकारणात सन्मानाची लढाई असते; ती पैशाची किंवा सत्तेची नसते. असे आवाहन यावेळी आमदार पंकज मुंडे यांनी यावेळी केले.