कुख्यात डॉन अरुण गवळी तुरुंगातून कायमचा येणार बाहेर

0

नागपूर – कुख्यात गुंड अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाच्या वतीने देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्याचांचा कालावधीही देण्यात आला आहे. २००६ च्या शासन निर्णयाद्वारे कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळी त्या याचिकेवर नागपूर खंडपीठावर सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. असं असलं तरी तुरुंग प्रशासनाला या संदर्भात उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधीही दिला आहे. मुंबईचे नगरसेवक कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला दोन जन्मठेपेची शिक्षा झाली होती.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech