मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात निलेश सांबरे यांच्या उमेदवारांमुळे महायुतीचे उमेदवार संकटात…!

0

ठाणे : विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 राखीव मतदारसंघ आहेत. या तिन्ही मतदारसंघात भाजप बंडखोरांसह निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास पक्षाच्या उमेदवारांमुळं आणि मनसेही मैदानात उतरल्यानं महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना फटका बसणार असल्याचं चित्र आहे. यामध्ये भिवंडी ग्रामीण आणि शहापूर हे अनुसूचित जमातीसाठी तर अंबरनाथ हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. भिवंडी ग्रामीणमधून शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, शहापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दौलत दरोडा, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर या तिघांनाही महायुतीनं पुन्हा रिंगणात उतरवलं आहे. मात्र, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत असली, तरी मनसे आणि भाजपाच्या बंडखोर उमेदवारामुळं या मतदारसंघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे… त्यामुळे या मतदारसंघात मतदार कल कुणाकडे हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

महायुतीकडून ही जागा शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे हे लढवत आहेत, तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महादेव घाटाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे भाजपाच्या महिला नेत्या स्नेहा पाटील यांच्या बंडखोरीमुळं भाजपा कार्यकर्त्यांनी अजूनही शिवसेनेची प्रचार मोहीम हाती घेतली नाही. त्यामुळं ही बंडखोरी शांताराम मोरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात मनसेनं वनिता कथोरे यांना उमेदवारी दिली असून मनसेचे तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष हे भिवंडी ग्रामीण मतदारसंघात राहत असल्यानं मनसे नेत्यांसाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्यानं मनसेनेदेखील येथं जोर मारला आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.

भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गोदाम पट्टा, कारखाने, स्टील कंपन्या असल्यानं अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं रस्त्यांची दुरवस्था, प्रचंड वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याची समस्या, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांचा अभाव, अवकाळी पावसानं मेटाकुटीला आलेले शेतकरी, आदिवासींच्या वनहक्क जमिनीचे प्रलंबित प्रश्न, निवारा, रस्त्यांच्या समस्या, 60 गावांतील ग्रामविकासाकडे एमएमआरडीएचं दुर्लक्ष आणि त्यामुळं वाढलेली अनधिकृत बांधकामं अशा अनेक समस्या या मतदारसंघात कायम आहेत. महायुतीकडून ही जागा शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे हे लढवत आहेत, तर महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महादेव घाटाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या समस्या सोडविण्यासाठी गेली 10 वर्ष आमदार मोरे यांनी पाठपुरावा केला नसल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महादेव घाटाळ यांनी केला असल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रसाराचा मुद्दा केल्याचं दिसून येत आहे.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत जिजाऊ विकास पक्षाचे सांबरे याच विधानसभा मतदारसंघात 75 हजार मतं मिळवत भिवंडी लोकसभेत 2 लाख 35 हजार मतांचा टप्पा गाठला होता. त्यामुळं यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे त्यामुळे महायुती आणी महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान येथे निर्माण झाले आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघात आदिवासी बहुल दुर्गम विभाग आहेत. येतं आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज अशा अनेक समस्या आजही कायम आहेत. मुंबई ठाणे शहरांना पाणी पुरवठा करणारी भातसा, वैतरणा, तानसा सारखी तिनंही मोठी धरणं शहापुर तालुक्यात आहेत. परंतु धरण उशाला आणी कोरडं घशाला या युक्तीप्रमाणं आजही या धरणांच्या बाजुला आसलेल्या शेकडो वाड्या वस्त्यांवर पाण्याची भीषण टंचाई आहे. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासूनची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या 200 हून अधिक पाणी योजना राबविण्यात आल्या आहेत.
शहापूर विधानसभा मतदारसंघात आदिवासी बहुल दुर्गम विभाग असल्याने भ्रष्टाचारामुळं निम्म्याहून अधिक पाणी योजना कागदावरच राहिल्यानं काही कंत्राटदारांवर गुन्हेही दाखल झाले. मात्र, दाखल गुन्हांच्या चौकशीचं पुढं काय झालं? हा संशोधनाचा विषय ठरला असला तरी हा फॅक्टरही तेवढाच महत्त्वाचा ठरेल. शहापुर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे (शरद पवार गट ) पांडुरंग बरोरा विरोधात महायुतीचे (राष्ट्रवादी काँग्रेस) दौलत दरोडा अशी थेट लढत आहे. मात्र, जिजाऊ विकास पक्षानं अपक्ष उमेदवार म्हणून रंजना उघडा व मनसेनं हरिचंद्र खांडवी यांना उमेदवारी देऊन महायुती आणी महाविकास आघाडीला मोठं आव्हान दिलं आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदार संघात निलेश सांबरे उमेदवार होते. त्यामुळे माजी मंत्री कपिल पाटील यांच्या पराभवाचे कारण ठरत बाळया मामा म्हात्रे विजयाचे धनी ठरलेत. त्यामुळे आता सांबरे यांच्या उमेदवारांमुळे महायुती चे ४ उमेदवार संकटात आहेत…

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा मैदानात उतरवल्यानं भाजपाच्या माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह भाजपाचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मात्र, त्यानंतर नरेंद्र पवार यांनी माघार घेतली. दुसरीकडं या मतदारसंघातून महविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिन बासरे तर मनसेचे उल्हास भोईर रिंगणात असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या लढाईत युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तर कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा मैदानात उतरवल्यानं भाजपाच्या माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह भाजपाचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मात्र, त्यानंतर नरेंद्र पवार आणि वरुन पाटील यांनी माघार घेतली. दुसरीकडं या मतदारसंघातून महविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिन बासरे तर मनसेचे उल्हास भोईर रिंगणात असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या लढाईत युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech