*“कोमट” पाण्यातील गॅरंटीच्या “चकल्या”!!*
ज्यांच्या मुख्यमंत्री काळात
मंत्री गेले, खासदार गेले..
गेले आमदार आणि नगरसेवक ही..
जवळपास गेली ना, सगळीच पार्टी..
*तेच सांगतात त्यांचीच चालते महाराष्ट्रात गॅरंटी ?*
*ज्यांना त्यांच्याच माणसांनी केले पायउतार*
*तेच स्वतःच्या गॅरंटीची स्वतःच वाजवतात सतार!*
*एक PUC न काढलेले तोंड रोजच बोलते*
विश्वविख्यात प्रदुषण सकाळी सकाळी करते
त्यांचाच संसर्ग त्यांच्याच पक्षात वाढतोय
*”कोमट” पाण्यात गॅरंटीच्या “चकल्या” बघा कोण पाडतोय?*
*टोमण्यांची बॅग झाली वाटतं तपासणीत जप्त..*
*यांचा वॉरंटी संपलेला “फराळ” थोडा इथं खपतो!*