मुंबई – मुंबई कॉंग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राजीव शुक्ला म्हणाले की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून भारतीय जनता पक्षांने तोडफोड करुन सरकार बनवले, हा जनतेचा विश्वासघात आहे. युती सरकारने भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम केले असून तब्बल २ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. पण जनतेला मात्र काहीच मिळलेले नाही. भ्रष्टाचारासाठी भाजपा युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांनाही सोडले नाही. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. ते पुतळा त्यामुळे पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुरेंद्र राजपूत, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते, मुंबई काँग्रेसचे खजिनदार संदिप शुक्ला, प्रवक्ते निजामुददीन राईन आदी उपस्थित होते
भारतीय जनता पक्ष युती सरकारने मागील अडीच वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज माफिया वाढले आहेत. तरुण पिढीला नशेत ढकललं जात आहे. अरबो रुपयांचा ड्रग्ज धंदा खुलेआमपणे सुरु असून उडता पंजाबप्रमाणे उडता महाराष्ट्र बनवला आहे. काँग्रेस मविआचे सरकार आल्यानंतर ड्रग्जच्या विळख्यातून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी कठोर कायदा करू. उडता महाराष्ट्र बनू देणार नाही, अशी ग्वाही खासदार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजीव शुक्ला यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांच्या सोयाबिनला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव दिला जाईल. काँग्रेस पक्षाने दिलेली आश्वासने पाळलेली आहेत. युपीए सरकारने शेतकऱ्यंची ७१ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मनरेगा, माहिती अधिकार कायदा दिला. आताही कर्नाटक, तेलंगणा व हिमाचल प्रदेशात काँग्रेसने दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी सुरु आहे असे राजीव शुक्ला यांनी सांगितले.