नाशिक : विधानसभा निवडणुकीतील पश्चिम नाशिक मतदार संघातील मनसेचे उमेदवार दिनकर पाटील यांच्या प्रचारासाठी ठाकरे नाशिकमध्ये आले होते. रोजच्या सभेत काय बोलणार. मी फक्त निवडणुकीमुळे तुमचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात. काही मतदारसंघात मी दोन – दोन सभा घेत आहे. परंतु संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणे शक्य नसल्याने मी महाराष्ट्रातील तमाम जनतेची दिलगिरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या पाच वर्षांपासून राज्यात घाणेरडे राजकारण सुरू आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवारांनी हे राजकारण सुरू केल्याचा घनाघात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येथील सभेत केला. 2019 पासून राज्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे. हे राजकारण 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर शरद पवारांनी सुरू केले होते. लोकांनी ज्यांना निवडून दिले त्यांनी दुसऱ्या पक्षाची सोबत करून तुमच्या मतांचा अपमान केला आहे.
तुम्हाला कोणालाही विश्वासात न घेता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी उतावळे झाले होते. यात महाराष्ट्राचे हित असते तर मी समजू शकलो असतो. मात्र, ते फक्त स्वार्थासाठी मुख्यमंत्री झाले असून असा मुख्यमंत्री मी कधीही होणार नाही. पण ज्यांना साथ देईल त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या हिताची कामे करून घेईल. पंतप्रधान मोदींचे मी खास अभिनंदन करेल कारण मुंबईच्या सभेत मी त्यांच्यापुढे महाराष्ट्र हिताचे पाच विषय मांडले होते. त्यातील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.
छत्रपती शिवाजी महाराज संत ज्ञानेश्वर संत तुकाराम डॉक्टर आंबेडकर हे सर्व मराठी भाषेत बोलायचे याचा मला अभिमान आहे ही श्रीमंती देशातील इतर राज्यात फक्त आपल्याकडे आहे. माझ्या वचननाम्यात सर्वात पहिले नाशिक- मुंबई हा रस्ता खड्डे मुक्त करण्याचा आहे. कारण रस्ते चांगले असेल तर उद्योग येतात. यांच्या काळात औद्योगिक नगरी असलेल्या नाशिक मधील जवळजवळ 500 उद्योग बंद पडले आहेत. तुम्ही माझ्या उमेदवारांना निवडून द्या मी नाशिकला आयटी पार्क आणतो. नाशिकला सीएसआर फंडातून बोटॅनिकल पार्क उभा केला. मात्र, एकही राजकारणी उद्योजकांकडे सीएसआर फंड मागण्यासाठी जात नाही. कारण त्यात त्यांना पैसे खाता येत नाही. सर्व कामे ही कंपनीच करते. मला पाच वर्षात नाशिकसाठी खूप काही करायचे असल्याचा शब्दही ठाकरे यांनी उपस्थित हजारोंच्या जनसमुदायाला दिला.