भव्य प्रचार रॅलीने दिली मंत्री छगन भुजबळ यांच्या विजयाची ग्वाही

0
  • मंत्री छगन भुजबळांची प्रचार नव्हे विजयी रॅलीची सर्वत्र चर्चा
  • ठिकठिकाणच्या भव्य स्वागताने मंत्री छगन भुजबळ यांचा विजय पक्का

येवला : येवला-लासलगाव मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार छगन भुजबळ यांची आजची भव्य प्रचार रॅली ही जणू विजयी रॅलीच असल्याची चर्चा संपूर्ण मतदारसंघात होत आहे. अतिशय उत्स्फुर्तपणे नागरिकांनी केलेले स्वागत, हिरीरीने रॅलीत सहभागी झालेले वृद्ध यामुळे ही रॅली आकर्षण ठरली. येवला आणि विंचूर येथे झालेल्या या रॅलीने भुजबळ यांच्या विकासकार्यालाच नागरिकांचे प्राधान्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, रिपाइ (आ) आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज येथे सकाळी ११ वाजेच्या सुमारास भव्य प्रचार रॅली सुरु झाली. शनी पटांगण येथून सुरू झालेल्या या रॅलीत संपूर्ण येवला शहर भुजबळमय झाल्याचे पहायला मिळाले. रॅलीच्या मार्गात उत्स्फुर्तपणे होणारे भुजबळ यांचे स्वागत जणू त्यांच्या विजयी सन्मानाचे चित्र प्रतित करीत होते.

यावेळी आमदार पंकज भुजबळ, प्रचार प्रमुख तथा प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर,तात्यासाहेब लहरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे,अरुण थोरात, एल.जी.कदम, माजी नगरध्यक्ष हुसेन शेख, बंडू क्षीरसागर, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, किसनराव धनगे, किशोर सोनवणे, धनंजय कुलकर्णी, दिपक लोणारी, भाजप शहराध्यक्ष मीनानाथ पवार, शिवसेना शहराध्यक्ष अतुल घटे, मच्छिंद्र थोरात, राजाभाऊ लोणारी, राजश्री पहिलवान, अमजद शेख,मतीन अन्सारी, मुश्ताक शेख, गुड्डू जावळे, मकरंद सोनवणे, युनुस मेंबर, मलिक मेंबर, डॉ. चंद्रशेखर क्षत्रिय, दत्ता निकम, जावेद लखपती, सुभाष गांगुर्डे,सचिन सोनवणे,गोटू मांजरे,विकी बिवाल, सुमित थोरात, विशाल परदेशी, अविनाश कुक्कर यांच्यासह महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

शनी पटांगणावरुन रॅलीला प्रारंभ : भुजबळ यांची भव्य जाहीर सभा शनी पटांगणावर रविवारी सायंकाळी संपन्न झाली.आणि याच पटांगणावरुन सोमवारी सकाळी १० वाजता प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. छगन भुजबळ यांच्यासह मान्यवरांनी महापुरुषांना अभिवादन केले. त्यानंतर ही रॅली थिएटर मार्गे आझाद चौक, देवी खुंट, आईना मस्जिद, जुना माळीपुरा,मलिक मेंबर घर,नागड दरवाजा, बुंदेलपुरा,सनी पटणी घर,मेन रोड,खांबेकर खुंट,शिंपी गल्ली,काळा मारुती,गंगा दरवाजा, फत्तेबुरुज नाका,डीजी रोड,खांबेकर खुंट,इंद्रनील हॉटेल मार्गे ही रॅली संपर्क कार्यालय येथे आली. तेथे रॅलीची सांगता झाली.

झेंडे आणि निशाणीचा जोर :  रॅलीमार्गात राष्ट्रवादी काँग्रेस नाव, घड्याळ निशाणी, छगन भुजबळ यांचा फोटो असलेले विविध झेंडे फडकत होते. विविध रंगी या झेंड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, भाजप, रिपाइं या पक्षांचेही झेंडे दिसत होते.

जागोजागी सत्कार,औक्षण :  भुजबळ यांचा जागोजागी सत्कार करण्यात येत होता. काही जण पुष्पहार आणत होते. काही ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला जात होता. काही ठिकाणी महिला भुजबळ यांचे औक्षण करीत होत्या.

क्रेनच्या सहायाने भव्य हार, पुष्पवृष्टी : रॅलीतील पुष्पवृष्टी खास बाब ठरली. अनेक घरांवरुन, इमारतीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरुन छगन भुजबळ यांच्यावर पुष्पवृष्टी केली जात होती. काही ठिकाणी महिला आणि तरुणींनी फुलांची उधळण भुजबळ यांच्यावर केली. एका चौकात एका समाजाच्यावतीने फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली. त्यामुळे भुजबळ ज्या जीपमध्ये उभे होते ते पूर्णपणे फुलांनी भरले होते. काही चौकांमध्ये तर थेट जेसीबीद्वारे भुजबळ यांच्यावर आणि रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच क्रेनच्या सहायाने भव्य हार घालण्यात आला.

साहेब ही सदैव तुमच्या सोबत: साहेब आम्ही गेल्या वीस वर्षांपासून आम्ही तुमच्या सोबत असून यापुढेही आम्ही सदैव तुमच्या सोबतच राहणार आहोत अशा आशयाचे फलक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले आहे. या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech