मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क सज्ज 

0

* राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा यंत्रांचे कर्मचारी तैनात
* आचारसंहिता कालावधी दरम्यान राज्यभरात ५३२ एफआयआर

मुंबई : विधानसभा निवडणूक – २०२४’ अंतर्गत बुधवार,‌ २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. होणाऱ्या मतदान पर्वांसाठी मतदान प्रक्रियेसाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क व सजग झाली आहे . यंदाच्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेसाठी दि. १५ ऑक्टोबर २०२४ पासून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहिता कालावधी दरम्यान आचारसंहिता व निवडणूक विषयक विविध तक्रारींच्या अनुषंगाने ५३२ एफ आय आर दाखल झाले आहेत. यापैकी २१० प्रकरणे ही आदर्श आचारसंहितेच्या भंगाशी संबंधित असून ६३ प्रकरणे ही समाज माध्यमांशी संबंधित आहेत. तर उर्वरित २५९ प्रकरणे ही इतर बाबींशी संबंधित आहेत.
बुधवार,‌ २० नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यभरात मतदान होत आहे. ही सर्व प्रक्रिया शांततेत व खुल्या वातावरणात संपन्न व्हावी, यासाठी राज्यभरात २ लाखांपेक्षा अधिक पोलीस व सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलासोबत गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, राज्य सशस्त्र पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांच्या मनुष्यबळाचा समावेश आहे. या सर्व यंत्रणेला सतर्क आणि सजग राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech