एसटी बसमध्ये 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याने खळबळ

0

अहमदनगर : राज्यातील 288 विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यात आदर्श आचरसंहिता लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून स्थीर पथक आणि भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर रोकड व मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. तर निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर निवडणूक काळात या पैशाचा व वस्तूंचा वापर केला जात होता, याबाबतचा तपासही करण्यात आला. मात्र, आता चक्क एसटी बसमध्ये नोटांचा बंडल तब्बल 86 हजारांची रोख रक्कम सापडल्याने खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात एका एस टी बसच्या सीटखाली प्रवाशाला नोटांचा बंडल आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. 500 रुपयांच्या नोटांचे दोन बंडल सापडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे मतदानच्या एक दिवस अगोदर, दोन दिवसांपूर्वी हीच बस स्ट्रॉंग रुमपासून ईव्हीएम आणि कर्मचाऱ्यांना घेऊन मतदान केंद्रावर गेली होती. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील ही घटना असून एसटी आगार व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एस.टी बसमध्ये मोठी रक्कम मिळून आल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आहे.

ज्या युवकाला या नोटाचे बंडळ मिळाले त्या युवक प्रवाशाने मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा जपत बसच्या चालक वाहकांकडे नोटांचे हे दोन्ही बंडल 86 हजारांची रोख रक्कम सुपूर्द केली आहे. तसेच, ही रक्कम नेमकी कोणाची आहे, कोणत्या कामासाठी ही रक्कम बसमधून नेण्यात येत होती, याचाही तपास करण्यात येणार आहे. काल याच बसने कोपरगाव -वैजापूर-कोपरगाव अशा फेऱ्या केल्या आहेत. काल सायंकाळी कोपरगावहून धामोरीकडे जात असताना बसमधील एका विद्यार्थ्याला शेवटच्या सीटखाली नोटांचे दोन बंडल सापडले आहेत. एव्हढी मोठी रक्कम नेमकी कुणाची आणि बसच्या सीटखाली कशी आली? याबाबत पोलीस तपासात सर्वगोष्टी निष्पन्न होतील. सध्या बसमधील वाहकाकडून ही रक्कम संबंधित तपास यंत्रणेकडे देण्यात आली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech