राज्यात भाजपा ठरणार सर्वांत मोठा पक्ष?

0

मुंबई : पॉलिटिकल ब्युरे अँड अॅनालिसिस ब्युरो या संस्थेने मतदानानंतर लोकांच्या मनात नेमकं काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या संस्थेने राज्यात कोणाला किती जागा मिळणार? याचा अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार राज्यात भाजपाला 99 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना पक्षाला 33 जागा मिळू शकतात. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 19 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच महायुतीला एकूण 151 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस या पक्षाला 36 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला 38 जागा मिळू शकतात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 47 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाविकास आघाडीला एकूण 121 जागा मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील सर्वच जनतेचे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. त्यानंतर दुपारपर्यंत राज्यात नेमके कोणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होईल. त्याआधी वेगवेगळ्या संस्थांनी आपल्या एक्झिट पोलच्या अंदाजात नेमके कोणाचे सरकार येणार? याचे अंदाज व्यक्त केले आहेत. असे असतानाच आता आणखी एका संस्थेने एक्झिट पोलच्या माध्यमातून राज्यात कोणाचे सरकार येणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे. या निवडणुकीत एकूण सहा अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतात. समाजवादी पार्टीचाही दोन जागांवर विजय होण्याची शक्यता आहे. मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा दोन तर एमआयएम पक्षाचा एका जागेवर विजय होऊ शकतो. जनसुराज्य, भाकप, मनसे, रासप, सेकाप या पक्षांनाही प्रत्येकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech