अमरावती : तिवसा मतदारसंघात प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. या सभेनंतर धार्मिक ध्रुवीकरण, ‘बटेंगे तो करेंगे’ नाऱ्याचा जोरदार प्रचार राजेश वानखडे यांच्या प्रचारादरम्यान करण्यात आला होता. तर यशोमती ठाकूर यांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी देखील सभा घेतली होती. यशोमती ठाकूर यांचा पराभव होऊच शकत नाही, असे वातावरण निवडणुकीत तयार झाले होते. मात्र राजेश वानखडे यांनी ठाकूर यांचा पराभव केला. यशोमती ठाकूर ह्या राहुल ब्रिगेड मधील महत्त्वपूर्ण नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा झालेला पराभव जिल्ह्यातील काँग्रेससाठी मोठा फटका आहे.
अमरावतीतील कट्ट्रर प्रतिस्पर्धी असणाऱ्या नवनीत राणा आणि यशोमती ठाकूरांमध्ये पुन्हा शाब्दिक सामना रंगला होता. माजी खासदार नवनीत राणांनी डागलेल्या आरोपास्त्रावर राणांच्या नणंदबाईंनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते . ‘माझी नणंदबाई तीन टर्मपासून मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत पण गेल्या दहा वर्षांत मतदारसंघाला मागे नेण्याचं काम माझ्या नणंदबाईने केलं आहे,’ असे विधान नवनीत राणांनी यशोमती ठाकुर यांच्यावर करत शरसंधान केले होते, गेल्या काही दिवसांपासून यशोमती ठाकुर वर्सेस नवनीत राणा संघर्षही यशोमती ठाकुर यांच्या पराभवाला आल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत कुठलीही लाट नसताना त्यांचा झालेला पराभव अनाकलनीय असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे मोदी लाट असताना देखील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी सलग आपला गड कायम ठेवला होता.