पंतप्रधानांचा संविधानाविषयीचा आदर प्रतीकात्मकतेच्या पलीकडे – अश्विनी वैष्णव

0

नागपूर : नागपूरमध्ये भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच वार्षिक पदभरती कॅलेंडर सादर करण्याला अधोरेखित केले. यावेळी बोलतांना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले . संविधानाविषयी मोदी सरकारला आदर आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेत प्रवेश करण्यापूर्वी यासमोर नतमस्तक झाले, या कृतीचा दाखला दिला. संविधानाविषयीचा आदर प्रतीकात्मकतेच्या पलीकडे आहे, तो प्रत्येक कृतीतून प्रतिबिंबित होतो, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. नागपूरमध्ये अजनी रेल्वे मैदानात आयोजित केलेल्या अखिल भारतीय अनुसूचित जाती/जमाती रेल्वे कर्मचारी संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. यावेळी नागपूर भेटी दरम्यान वैष्णव यांनी दीक्षाभूमीवर सेंट्रल मेमोरियल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या दोन दिवसीय अधिवेशनाचा उद्या संविधान दिनी समारोप होणार आहे.

यावेळी मंत्र्यांनी सध्या सामान्य श्रेणीचे 12,000 डब्यांचे उत्पादन सुरू असल्याची माहिती देत विशेष आणि सामान्य डब्यांच्या उत्पादनासह रेल्वेच्या महत्त्वाच्या सुधारणांवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी कर्मचारी संघटनेच्या कार्याची माहिती देणाऱ्या एका स्मरणिकेचे देखील प्रकाशन केले. गेल्या दशकात पाच लाख रेल्वे कर्मचाऱ्यांची पारदर्शक पद्धतीने भरती केली आहे. या भरतीने 2004 ते 2014 दरम्यानच्या 4.4 लाखांच्या भरतीला मागे टाकले आहे, असेही रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष बी. एल. भैरवा, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक नीनू यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech