मुंबई : हळूहळू थंडीचे आगमन होऊ लागले आहे. दिवसा कडकडीत ऊन पडत असले तरी सायंकाळनंतर वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. गत काही दिवसांपासून धुके पडू लागले असून, पहाटेपासून सकाळपर्यंत थंडीचे प्रमाण चांगले असते. गारठा वाढल्यामुळे अद्याप पर्यत पावसाचा मुक्काम वाढला असल्याने १५ दिवस उशीरा का होईना परंतु गेल्या २२ नोव्हेबर पासून हवेत गारठा वाढल्याने बोचरी थंडीची चाहूल सुरू झाल्याचं संकेत दिसून येऊ लागले आहेत. कपाटात अडगळीला पडलेले ब्लाकेट, स्वेटर,कानटोप्या बाहेर डोकावू लागल्या आहेत. रस्स्त्यावर दुकाने देखील सजल्याचे दिसून येऊ लागली आहेत… यावर्षी दिवाळी सण तर थंडीविनाच गेला. दिवाळीतही काहींना उकाड्याचा त्रास जाणवत होता.परंतु गत दहा-बारा दिवसांपासून जिल्हावासीयांना गुलाबी थंडी जाणवू लागली आहे. दिवसा कडकडीत ऊन असले तरी त्याचा फारसा त्रास जाणवत नाही.
जो तो आप- आपल्या परिस्थिती नुसार थंडीचा सामना करतो, काही असेलत्या जुन्या पुराण्या कपड्यावर तर काही नवेकोरे महागडे, स्वेटर ,ब्लाकेट, खरेदी करतात,थंडी हा असा एकमेव मोसम आहे की तो गरीब, श्रीमंतात भेदभाव करीत नाही, मात्र ह्य थंडीचा खरा फटका बसतो तो रस्त्यावरील बेवारस, अनाथ, भिकारी, वर्गाला मात्र, जगी ज्याशी कोणी नाही त्यास “देव”आहे. भिकारी अनाथाचा तोच भार साह्य. हे ब्रिद वाक्या तो कृपाळू मायबाप, खोट होऊ देत नाही, गेल्या दोन दशकापासून रस्त्याच्या कडेला विसावलेल्या शेकडो जिवानी मायेचा ऊब देण्याच काम बबन हरणे नामे एक “अवलिया” ह्या रस्त्यावरील अनाथांचा नाथ बनून मदतीचा हात देत आहे.
आपल्या घरालगत स्त्याच्या कडेला असे उघड्यावर काही जिव असतील तर आपल्या घरातील जूने ब्लाकेट, स्वेटर, रस्त्याच्या कडेला बसलेला वर्गा दिल्यास त्यांना हि थंडी पासून बचाव होण्यास मदत होईल, रात्र भर शांत झोप लागणं याला सुद्धा नशिब लागतात, पण या साठी दिवसभर ईमानदारीच काम करावं लागतं, चला तर आपण ही एक हात मदतीचा पुढं करू या… देवाला जोडलेल्या दोन हात पेक्षा मदतीसा़ठी पुढे केलेल्या एक हाताची सेवा त्या वि़धात्याला लवकर पोहचते,यास्तव देव होता आलं नाही तरी देवदुताची कामगिरी पार पडू शकतो.