नागपूर : भारतीयांचा प्रजनन दर 2.1 टक्क्यांहून कमी नसावा असे प्रतिपादन सरसंघाचलाक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते आज, रविवारी नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. लोकसंख्येच्या दरात होत असलेली घट चिंतेचा विषय आहे. लोकसांखिकीच्या नियमानुसार लोकसंख्येचा वृद्धीदर 2.1 पेक्षा कमी नसावा. आधुनिक लोकसंख्या विज्ञानानुसार, जेव्हा एखाद्या समाजाची संख्या (प्रजनन दर) 2.1 पेक्षा कमी होते, तेव्हा तो समाज जगातून नष्ट होतो. एखाद्या समाजावर समजा कुठले संखट नाही आले. परंतु, त्यांचा प्रजनन दर कमी असला तरी असा समाज नामशेष व्हायला वेळ लागत नाही. याचप्रकारे अनेक भाषा, अनेक समाज नष्ट झाले. त्यामुळ लोकसंख्या वाढीचा दर 2.1 च्या खाली जाता कामा नये, असे सरसंघचालकांनी सांगितले.
प्रजनन दरात झालेल्या घटीबद्दल सरसंघचालक म्हणाले की, आपल्या देशाने 1998 किंवा 2002 मध्ये लोकसंख्या धोरण तयार केले. लोकसंख्येचा वृद्धी दर 2.1 च्या खाली जाता कामा नये असे त्यात नमूद करण्यात आले आहे. जर आपण लोकसंख्या वाढीचा दर 2.1 विचारात घेतला, तर आपल्याला दोनपेक्षा अधिक मुलांची गरज आहे, किमान 3 अपत्य तर असायलाच हवेत. लोकसंख्येचं विज्ञान हेच सांगते. समाज टिकायला हवा यासाठी संख्या महत्त्वाची असल्याचे भागवत यांनी यावेळी सांगितले.