“कुणी मुख्यमंत्री झाले नाही म्हणून दु:खी तर कुणाला मुख्यमंत्रीपदावरून दु:खी – गडकरी

0

नागपूर : नागपुरात आयोजित 50 गोल्डन रुल ऑफ लाईफ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात गडकरी म्हणाले की, राजकारण असो की कार्पोरेट जग असो इथे प्रत्येक जण असंतुष्ट आहेत. जो नगरसेवक झालाय, त्याला दुःख आहे की आमदार झालो नाही, आमदाराला मंत्री न होता आल्याचं दुःख आहे, तर जो मंत्री झालाय त्याला मनासारखे खाते मिळाले नसल्याचे दुःख आहे आणि मुख्यमंत्री होता न आल्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. जो मुख्यमंत्री झाला आहे, त्याला पक्षश्रेष्ठी केव्हा पदावरून बाजूला करतील याची भीती सतावतेय. राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे. इथे कुणीही समाधानी नाही. यावर एकच उपाय आहे तो म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंग असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा समुद्र असल्याचे म्हटले आहे. नागपूरमध्ये एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की, राजकारणात प्रत्येकजण दु:खी आहे. प्रत्येकाला ते सध्या ज्या पदावर आहेत, त्यापेक्षा मोठे पद हवे आहे. राजकारण हा असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे. इथे कुणीही समाधानी नाही. प्रत्येकाच्या महत्त्वाकांक्षा मोठ्या झाल्यात, त्यामुळे जीवनातील आनंद हरवलाय, असे प्रतिपादन ज्येष्ठ भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. नितीन गडकरींनी हे वक्तव्य रविवारी नागपुरात केले होते. परंतु, राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी हे विधान प्रचंड प्रमाणात व्हायरल होतेय.

“माणूस जेव्हा पराभूत होतो तेव्हा तो संपत नाही, जेव्हा तो हार मानतो तेव्हा तो संपतो.” हे रिचर्ड निक्सन यांच्या आत्मचरित्रातील वाक्य अधोरेखीत करताना गडकरी म्हणाले की, ‘सुखी जीवनासाठी चांगल्या मानवी संस्कारांची गरज आहे. जीवन हा तडजोडी, मजबुरी, अडथळे आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असले तरी ते आव्हाने आणि समस्यांनी भरलेले असते. त्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ समजून घ्यावे लागेल, असे गडकरींनी सांगितले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech