पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांवर कठोर कारवाई – मल्लिकार्जुन खर्गे

0

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर काँग्रेस पक्ष कठोर कारवाई करणार आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. २८ नोव्हेंबर रोजी पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला २० हून अधिक उमेदवारांनी, विरोधात काम करणा-या पदाधिका-यांच्या तक्रारी केल्या आहेत. यावेळी ज्यांनी पक्ष विरोधी काम केले आहे, त्यांच्यावर कठोर करण्याचे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले.

प्रदेश काँग्रेसकडून उमेदवारांच्या तक्रारींची दखल करुन नोटीस काढल्या जात आहेत. आतापर्यंत बंटी शेळके, सुरज ठाकूर यांच्यासह काही जाणांना नोटीसा दिल्या आहेत. मुदतीत नोटीसीला उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीच सरकार स्थापन करणार आहे. येत्या ५ डिसेंबरला नवीन सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, अद्याप राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार याबाबत घोषणा करण्याच आलेली नाही. दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे.

अनेक ठिकाणी बंडखोरी देखील झाली. तसेच काँग्रेसच्या काही पदाधिका-यांना पक्षाच्या विरोधात देखील काम केले आहे. त्यामुळे अशा पदाधिका-यांवर कारवाई होणार असल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच सर्वांत जास्त जागा लढवणा-या काँग्रेस पक्षाला देखील अपेक्षीत असे यश मिळाले नाही. काँग्रेसला फक्त १६ जागांवर समाधान मानावे लागले. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच बिघाडी देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. याचा देखील मोठा फटका महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांना बसला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech