विक्रांतच्या निवृत्तीमुळे चाहते नैराश्यात, ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा नुकताच रिलीज

0

मुंबई : विक्रांत मेस्सीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो 12 th fail या सिनेमामुळे चर्चेत आलेला. यापूर्वीही त्याने बऱ्याच सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. पण 12 th fail या सिनेमासाठी त्याचे विशेष कौतुक झाले. विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान, विक्रांत मेस्सीला धमक्या आल्याचा खुलासा त्याने केला होता. त्याच्या ९ महिन्याच्या मुलाला यात टार्गेट करण्यात आल्याचं त्याने म्हटलं होतं. कुटुंबाच्या सुरक्षेबाबत तो काळजीत आहे असं त्याने म्हटलं होतं. त्याच्या या निर्णयावर चाहते संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काही लोकांना हे समजू शकले नाही, तर काही लोक विक्रांतचा हा निर्णय योग्य मानून त्याला शुभेच्छा देत आहेत.

’12वी फेल’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने प्रेक्षकांना त्याचा धक्कादायक निर्णय सांगितला आहे. त्याच्या या निर्णयावर बरेच चाहते नाराज झाले आहेत. विक्रांत मेस्सीने वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी अभिनय क्षेत्रातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. विक्रांतने १ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनयातून निवृत्ती जाहीर केली आहे. प्रत्येक गोष्टीसाठी. ‘सदैव ऋणी’ या शब्दात विक्रांतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकीकडे अभिनेत्याच्या निवृत्तीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असताना दुसरीकडे सोशल मीडियावर चाहते विक्रांतने आपल्या मुलामुळे इंडस्ट्री सोडल्याचा अंदाज बांधत आहे.

विक्रांतने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या एका नोटमध्ये अभिनेत्याने लिहिले की, ‘गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्षे अभूतपूर्व होती. तुमच्या अभुतपूर्व पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसा मी पुढे जातो तसतसे मला जाणवतेय की आता घरी जाण्याची वेळ आली आहे. पती, वडील,मुलगा आणि अभिनेता म्हणूनही. येत्या २०२५ मध्ये आपण एकमेकांना शेवटचे भेटू. जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही.. शेवटचे २ चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा धन्यवाद.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech