वॉशिंग्टन : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इस्रायली नागरिकांना दिलेल्या धमकीने संपूर्ण जग चिंतेत सापडले आहे. या धमकीमुळे मध्य-पूर्वेसंबंधात अमेरिकेची कणखर भूमिका पहिल्यांदाच समोर आली असून या धमकीची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. “गाझा पट्टीत ओलीस ठेवण्यात आलेल्या इस्रायली नागरिकांना जर २० जानेवारी रोजी होणाऱ्या शपथविधीपूर्वी सोडले नाही, तर मध्य पूर्वमध्ये विध्वंस करेन.” अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी २ डिसेंबर रोजी दिली आहे. दरम्यान, दुसरीकडे इस्रायली सैन्याने गाझा सोडावा अशी हमासची मागणी आहे. ओलीसांच्या बदल्यात पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्याची मागणी तो करत आहे. हमासच्या मागणीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, “जोपर्यंत हमास पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत युद्ध सुरूच राहील.” डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान येण्याच्या दरम्यान, इस्रायलवर हमासच्या हल्ल्यादरम्यान २५० हून अधिक लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते. यापैकी सुमारे १०१ विदेशी आणि इस्रायली नागरिक अजूनही हमासच्या ताब्यात आहेत. यापैकी ३३ ओलिसांचा मृत्यू झाल्याचा हमासचा दावा आहे.
अमेरिकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी शिक्षा असेल. जर त्यांनी या काळात योग्य कार्यवाही केली नाही. तर अमेरिका अशी शिक्षा देईल, जी आजपर्यंत कोणालाही मिळाली नाही.” असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. गेल्या वर्षी पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलच्या सीमावर्ती भागात हल्ला चढवला होता. त्यावेळी हमासच्या अतिरेक्यांनी २५० पेक्षा अधिक लोकांना पकडून ओलीस ठेवले आहे. यामध्ये गाझा पट्टीत १०१ परदेशी नागरीक आणि इस्त्रायल ओलीस नागरीक जिवंत असल्याची माहिती समोर येत आहे. “या ओलिसांना २० जानेवारीपूर्वी मुक्त करा. तसे केले नाही तर मध्य-पूर्वेत विध्वंस करेल. जे माणुसकी सोडून सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार करत आहेत. त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल.