लोकसभेच्या अधिवेशनामुळे न्यायालयात हजर राहण्यासाठी राहुल गांधी यांना मुदतवाढ

0

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. गांधी हे लोकसभेच्या अधिवेशनात आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात गैरहजर राहण्याची परवानगी मिळून व्यक्तीशः उपस्थित राहण्यास मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात गांधी यांच्या वकिलांनी केला होता. त्यानुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी याबाबतचे आदेश दिले. गांधी दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याने न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असे अॅड पवार यांनी दाखल केलेल्या अर्जात नमूद केले होते.

गांधी हे लोकसभेच्या अधिवेशन काळात संसदेत उपस्थित असल्याने महत्वाच्या प्रश्नांची विरोधी पक्षाचे नेते म्हणून त्यांच्यावर जवाबदारी असल्याने ते कोर्टात उपस्थित राहू शकत नसल्याचे त्यांच्या वकीलामार्फत न्यायालयात सांगण्यात आले. गांधी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत बजावलेले समन्स त्यांच्या घरी पोहोचले होते. यापूर्वी पाठवलेले समन्स तीस हजारी जिल्हा न्यायालयाऐवजी पतियाळा हाऊस न्यायालयात पोहोचल्याने ते पुन्हा पुण्याच्या विशेष न्यायालयात परत आले होते. त्यामुळे गांधी यांना विशेष न्यायालयाकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले होते. गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद पवार यांनी गेल्या तारखेस अर्ज दाखल केला होता. गांधी हे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. देशातील विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर होते. न्यायालयाचे समन्स त्यांना मिळाले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech