नवी दिल्ली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत, देशाचे संविधान बदलेल. मोदी स्वतः लाल किल्ल्यावरून द्वेषपूर्ण भाषण देतील आणि संपूर्ण देशात लडाख-मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल,असा दावा केला आहे. परकला प्रभाकर यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत असून काँग्रेसने आपल्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्यास देशात काय बदल होईल? असे त्यांना एका यूट्यूब चॅनलला मुलाखत देताना विचारण्यात आले होते.
यावेळी परकला प्रभाकर म्हणाले की, “असे झाले तर तुम्ही पुन्हा निवडणुकीची अपेक्षा करू शकत नाही अशी शक्यता आहे. जर हे सरकार २०२४ च्या निवडणुकीनंतर परत आले तर नक्कीच निवडणुका होणार नाहीत. सध्या तुम्हाला असे वाटते की मणिपूरमध्ये हिंसाचार घडत आहे, त्यामुळे येथे घडण्याची शक्यता नाही. तुम्हाला असा विचार करण्याची गरज नाही.