तापमानात होणार घट होणार, राज्यात गुलाबी थंडी परतणार…

0

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील काही भागातील हवामान बदल होऊन नागरिकांना आता गुलाबी थंडीचा आनंद घेता येणार आहे. येत्या दोन दिवसात काही भागात हलक्या सरींची शक्यता असली तरी उर्वरित भागात हवामान कोरडे होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता राज्यात गारठा वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तब्बल आठ दिवसांनी पुन्हा वातावरणात बदल होऊन थंडीची चाहूल लागली आहे.

काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. थंडीचा जोर पूर्णपणे कमी झाला, तर काही भागात उकाडा जाणवू लागला आहे. ९ डिसेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. ७ डिसेंबरपासून पुन्हा तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे. तर आज (८ डिसेंबर) रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. फेंगल चक्रीवादळाच्या इफेक्टनंतर ७ डिसेंबर रोजी किमान तापमानात गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत घट झाल्याचे पहायला मिळाले.

उद्या (९ डिसेंबर)पर्यंत राज्यातील बहुतांश भागांत शुष्क अन् कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांनी थांबवल्याने अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्यांचा वेग वाढून अवकाळी पावसाला पोषक परिस्थिती तयार झाली आहे. आता कमी दाबाचा हा पट्टा ओसरला असून कोरडे वारे राज्यभर वाहणार आहेत. दरम्यान, काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech