उत्तर मुंबईत गीता जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम ; गोपाळ शेट्टी यांचा पुढाकार

0

 

( योगेश वसंत त्रिवेदी )

मुंबई, : दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार , 11 डिसेंबर २०२४ रोजी पोयसर जिमखाना, कांदिवली (पश्चिम) येथे भव्य गीता जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री सी. पी. राधाकृष्णन हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. इस्कॉन संस्था, जुहूचे अध्यक्ष परमपूज्य श्री ब्रिज हरिदास यांचीही प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे.
डिसेंबर 2021 मध्ये तत्कालीन खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकसभेच्या सभागृहात श्रीमद भगवत गीतेचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी केली होती. प्रशासनाने शाळांमध्ये हा विषय लागू करण्यापूर्वीच जनसेवक गोपाळ शेट्टी यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी गीता अभ्यास कार्यक्रम सुरू केला. या संपूर्ण कार्यक्रमासाठी गीता अभ्यास समितीही स्थापन करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष व भाजप नेते डॉ. योगेश दुबे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही 11 डिसेंबर, बुधवारी भव्य गीता जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या 11 डिसेंबर 2024, बुधवार, गीता जयंती निमित्त कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखाना येथे सायंकाळी 5.30 वाजता भव्य दिव्य सोहळा जनसेवक गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेनुसार होणार आहे, ज्यात नृत्यसम्राज्ञी पद्मश्री डॉ. सितारा देवी यांच्या कन्या डॉ. जयंती माला भव्य श्रीकृष्ण लीला कार्यक्रम सादर करतील.
उत्तर मुंबई भाजपचे ज्येष्ठ नेते श्री भाई गिरकर, विधानपरिषदेचे गटनेते श्री प्रवीण दरेकर, आमदार सर्वश्री अतुल भातखळकर, योगेश सागर, मनीषा चौधरी, संजय उपाध्याय, प्रकाश सुर्वे, भाजप उत्तर मुंबई अध्यक्ष गणेश खणकर, सर्व नगरसेवक, भाजप व पोयसर जिमखान्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech