छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यातील जायकवाडी धरणात फक्त १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाणीसाठा कमी राहिल्याने उद्योजकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागेल. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांची चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यातच पाणीसाठा १८ टक्क्यांवर आल्याने येत्या काळात हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले जाण्याची शक्यता आहे.
उद्योगांच्या पाणी कपातीबाबत सध्यातरी कोणताही निर्णय प्रशासनाने घेतला नाही, मात्र आगामी काळात परिस्थिती चिंताजनक राहिली तर उद्योगांच्या पाणीकपातीचा विचार करू असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी म्हटले आहे. २०१६ साली एप्रिल महिन्यात उद्योगांच्या पाणीकपातीचा निर्णय झाला होता. त्यानंतर ८ वर्षांनी तशी परिस्थिती ओढावते की काय अशी भीती सध्या व्यक्त केली जात आहे.