अजित पवारांकडून नरेंद्र मोदींचं कौतुक

0

बारामती – सर्वांचं व्हिजन होतं, म्हणून बारामतीचा विकास झाला. 10 वर्षात मोदींनी कधीही सुट्टी घेतली नाही. जगात तिसऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणण्याचे मोदींचे प्रयत्न केले आहेत. रस्त्यांची सर्व कामे चालली आहेत. त्याला केंद्राचा पैसा वापरला जात आहे. राजकारणात कुणीही कुणाचे शत्रू नसते आणि मित्र देखील नसते. उद्योगपतीच्या कार्यक्रमात मोदींनी सांगितले मी जेव्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होईल त्यावेळेस मी दोन महिन्यात असे निर्णय घेईल. देश स्मरणात ठेवल, असं सांगितलं. मोदी हे सर्व व्हिजन असलेलं नेतृत्व आहे, असंही अजित पवार म्हणाले.

आज गुढीपाडव्याचा सण आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मूळगावी म्हणजेच बारामतीतील काटेवाडी लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतं आहे. काटेवाडीतील निवासस्थानी विधीवत पूजा करुन गुढी उभारण्यात आली. यावेळी अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते. गुढीपाडवा साजरा केल्यानंतर अजित पवार मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. बारामतीकरांशी संवाद साधताना त्यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणूक अन् प्रचारावर अजित पवार बोलते झाले.

18 तारखेला पुण्यात बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिरूर, मावळ, बारामती तीन मतदारसंघाचे एकत्र अर्ज भरणार आहोत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्ज भरण्यासाठी येणार आहेत. बारामतीमधील पदाधिकाऱ्यांना अर्ज भरण्यासाठी यायचं आहे, असं आवाहन अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केलं आहे.
महायुती उमेदवार कोण द्यायचा सुनेत्रा अजित पवार यांचे नाव पुढे आलं आहे. आपण सगळेजण पहिल्यापासून पवारांच्या पाठीमागे उभं राहिलात. येणाऱ्या निवडणुकीत पवार आडनावाला मत द्या. पहिलं साहेब, नंतर पुतण्या आणि नंतर लेक आणि आता सुनेला मत द्या… म्हणजे कुणीही नाराज होणार नाही, असं आवाहन अजित पवार यांनी मतदारांना केलं आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech