अशोक चव्हाण म्हणतात, “काँग्रेस मधून मी बाहेर पडल्याने फरक”

0

मुंबई : लोकसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन राज्यात काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाला केवळ १७ जागांवर थांबावे लागले. याचा विचार पक्षाच्या वरिष्ठांनी करण्याची गरज आहे. मी जाण्याने काँग्रेसला फरक पडला किंवा नाही हे मी सांगू शकत नाही, मात्र पक्षात गटबाजी वाढली असल्यामुळे अनेकजण पक्षातून बाहेर पडण्याची शक्यता असल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. काँग्रेसमधून भाजपवासी झालेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

राज्याला मिळालेले नेतृत्व कोणालाही विश्वासात न घेता स्वत: निर्णय घेत असतात. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष असताना महाविकास आघाडीमध्ये प्रादेशिक पक्षाला जास्त जागा दिल्या जातात. काँग्रेसला केवळ १७ जागा मिळतात. सांगलीच्या जागेवरुन काँग्रेस नरमली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील नेतृत्व किती कमजोर झाले हे लक्षात आले, अशी टीका त्यांनी केली. संजय निरुपम सारखा चांगला नेता काँग्रेसने गमावणे याचा विचार पक्षाने करायला पाहिजे. आम्ही त्यांना काढले असे वक्तव्य करणे योग्य नाही. त्यामुळे पक्षातील अन्य नेते विचार करतात. काँग्रेसमध्ये गटबाजी वाढलेली आहे. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलो, असेही चव्हाण यांनी सांगितले. राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहेत. त्यांच्या सभांना मोठी उपस्थिती असते. त्यांची रोखठोक शैली असून त्यांचा मोठा वर्ग आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech