अमरावती : शासनाच्या निराधार योजनेचे मागील तीन महिन्यापासून पैसे न मिळाल्याने वयोवृद्ध विधवा अपंग यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा लाभार्थ्यांच्या वतीने ठाकरे गटाच्यावतीने शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी दिला असून यावेळी, बोलतांना ते म्हणाले सात दिवसांत निराधारांचें पगार न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला तालुक्यातील अपंग, विधवा महिला,परितक्ता, वयोवृद्ध लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणारे पगार मागील तीन महिन्यापासून थांबल्याने लाभार्थ्यांना तहसील कार्यालय व बँकेत चकरा माराव्या लागत असल्याने लाभार्थी हैराण झाले आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे लाभार्थ्यांनि शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनि लाभार्थ्यांनसह तहसील कार्यालयात धडक देऊन तहसीलदार यांना निवेदन सादर करून सात दिवसांत पगार वाटप न झाल्यास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला यावेळी मोहम्मद नाझीम देवराव मेश्राम अशोक थोरात भीमराव शिरभाते विठोबा देवघरे सुरेश चौरागडे पिरिस पवार यशोदाबाई वाघाडे दुर्गाबाई बनसोड यांचेसह अनेक लाभार्थी उपस्थित होते.