मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलिसांची मानवंदना आणि अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ नकोत
देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत यापुढे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये पोलीस मानवंदनेची प्रथा बंद करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री कार्यालयातील अप्पर मुख्य सचिव विकास खरगे यांनी याबाबतचे लेखी आदेश आज राज्यभरातील प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांना जारी केले आहेत. या पत्रामध्ये विकास खर्गे यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार यापुढे मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरातील कोणत्याही दौऱ्याप्रसंगी कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांना सत्कारासाठी पुष्पगुच्छ आणू नयेत तसेच मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारी पोलीस मानवंदनीची प्रथा ही देखील बंद करण्यात यावी असेही खर्गे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस प्रमुख तसेच महापालिका आयुक्तांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे.