कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाची मंजुरी

0

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मानले आभार

ठाणे:  कल्याण डोंबिवलीसह नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांसाठी अमृत योजनेंतर्गत ३५७ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

या योजनेला मान्यता दिल्याने कल्याण डोंबिवलीसह २७ गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे खासदार डॉ.शिंदे यांनी सांगितले. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही पाणी पुरवठा योजना करण्याबाबत कल्याण डोंबिवलीकरांना शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केल्याचे सांगत कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी यापुढेही सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली.

केंद्र शासनाचे भक्कम पाठबळ राज्याला मिळत असून राज्य शासन केंद्र शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यासह ठाणे जिल्हा आणि कल्याण डोंबिवली परिसराचा अधिक वेगाने विकास होईल असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech