नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न?

0

मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात आता मोठी नेतेमंडळीही जनमानसात जाऊन प्रचार करताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही यास अपवाद नाहीत. पण, भंडारा जिल्ह्यातील कारदा गावाजवळ परतीच्या वाटेवर असतानाच नाना पटोले यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. पटोले यांच्या कारला धडक देत चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला असून, ही गंभीर घटना असल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले. भाजपकडून पटोलेंचा घातपात करण्याचा डाव असा आरोप करणारे ट्वीट लोंढे यांनी केले.

जिथे अपघात झाला तिथे सध्या रस्त्याचे बांधकाम सुरू असल्यामुळे तिथे वाहनांचा वेग अतिशय कमी असतो. त्यातही नाना पटोले यांची कार तिथे उभी होती आणि त्या कारला ट्रकने मागून धडक दिली. या अपघाताची चौकशी करण्यात यावी ही मागणी लोंढे यांनी केली. विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असणा-या पटोले यांची सुरक्षा सरकार बदलल्यानंतर काढण्यात आली, किंबहुना प्रत्येक काँग्रेस नेत्याची सुरक्षा कमी करण्यात आली त्यामुळे इथे शंकेला वाव मिळत असल्याचे म्हणत अतुल लोंढे यांनी पुन्हा एकदा अपघाताचा संदर्भ दिला. सुदैवाने कारला एका बाजूने धडक बसल्यामुळे मोठे संकट टळले.

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंका आहे. सदर प्रकरणी आपण रीतसर तक्रार दाखल करणार असल्याचेही लोंढे यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत कधीही न घडलेली घटना, विरोधी पक्षनेत्यांच्या सुरक्षेत करण्यात आलेली घट आणि त्यानंतर झालेला अपघात पाहता या घटनांची साखळी चिंताजनक असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech