महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन खुर्चीवरून वाद !

0

मुंबई : आज वाशिम शहरात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य व यवतमाळ वाशिम लोकसभा समन्वयक राजू पाटील राजे भाषण करण्यासाठी गेले असता त्यांच्या खुर्चीवर स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुपुत्र ज्ञायक पाटणी बसले. मात्र, राजू पाटील राजे भाषण आटोपून आले असता ज्ञायक पाटणी यांनी खुर्ची न दिल्याने काही काळ एकच गोंधळ उडाला होता.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागल्याने आज वाशिम शहरातील पाटणी कॉम्पलेक्स येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजश्री पाटील महाले यांच्या समर्थनार्थ महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर स्व. आमदार राजेंद्र पाटणी यांचे पुत्र ज्ञायक पाटणी समोरील रांगेत बसले होते. यावेळी नेत्यांनी आपापले विचार व्यक्त केले. त्यानंतर भाजपचे प्रदेश सदस्य तथा यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक राजू पाटील राजे भाषण करण्यासाठी गेले. त्यावेळी ज्ञायक पाटणी त्यांच्या खुर्चीवर बसले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech