सोलापूर महानगरपालिकेत डॉ. भूषण जाधव यांची क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती

0

कल्याण : अविनाश ओंबासे

कल्याणचे क्रीडा शिक्षक डॉक्टर भूषण जाधव यांनी सोलापूर महानगरपालिका क्रीडा अधिकारी पदी नुकतेच रुजू झाले. तलवारबाजी या खेळाचे एनआयएस कोच असणारे डॉक्टर भूषण जाधव हे कल्याणच्या सेकंड हार्ट शाळेचे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. तलवारबाजी या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मजल मारली. तलवारबाजीच्या या कामगिरीबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन ही नुकतेच गौरवण्यात आले होते. या सर्व कार्याची दखल घेत सोलापूर महानगरपालिकेने त्यांना सरळ क्रीडा अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. मूळचे छत्रपती संभाजीनगर चे असणारे डॉक्टर भूषण जाधव यांनी लहानपणापासूनच डॉ. उदय डोंगरे सर, अशोक दुधारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजी या खेळांमध्ये आपले करिअर करण्याचे आवाहन आव्हान स्वीकारले.

कुटुंबातूनही त्यांना या खेळासाठी पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळाले त्यामुळेच त्यांनी तलवारबाजी हा खेळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य स्पर्धां बरोबरच तलवारबाजी प्रशिक्षणासाठी विदेश दौरे ही केले. या खेळाचे NIS चे पहिले प्रशिक्षक म्हणून ही त्यांनी राज्यात मान पटकावला. तलवारबाजी या खेळामध्ये त्यांना डॉ. उदय डोंगरे, अशोक दुधारे सर, सेक्रेड हार्ट स्कूलचे संचालक अल्बिन अँथोनी सर यांचे मार्गदर्शन भेटले तर या निवडीबद्दल त्यांचे डॉ उदय नाईक, प्रा. लक्ष्मण इंगळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर, अविनाश ओंबासे, प्रताप पगार, राम म्हात्रे, विश्वास गायकर, विजय सिंग, महादेव क्षीरसागर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech