कल्याण/डोंबिवली : गणेश ठाकूर
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क्रीडा संकुलाच्या दुरावस्थेमुळे ठाकरे शिवसेना गटाला आपल्या क्रीडा स्पर्धा भरविण्यास अडचणी निर्माण झाल्याने संतप्त शिवसैनिकांनी आज कल्याण पालिकेचं अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. क्रीडा संकुलाची दुरावस्था झाल्याने क्रीडा स्पर्धा घेणे कठीण झाले शिवसनिकांनी तात्काळ महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गायकवाड आणि अन्य अधिकाऱ्यांना जाब विचारला. डोंबिवली ठाकरे शिवसेना गटाच्या वतीने शालेय स्पर्धांचे आयोजन डोंबिवली मधील क्रीडा संकुलात करण्यात आले होते १० ११ व १२ जानेवारी रोजी या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. मात्र संकुलाची दुरावस्था झाल्याने शिवसैनिक संतप्त झाले. स्पर्धा आयोजन तोंडावर येऊन सुद्धा महापालिकेने मैदानाची दुरुस्ती न केल्याने स्पर्धा भरवणे कठीण झाले.
या बाबत बोलताना शिवसेना उपजिल्हा प्रमुख तात्या माने यांनी सांगितले की पक्षाच्या वतीने जीएसटी सांगत आम्ही मैदानाचे सर्व पैसे ६ नोव्हेंबर रोजी भरले होते. कबड्डी खोखो अशा मैदानी स्पर्धा आहेत आणि अशा स्पर्धे बाबत आधीच सर्व महापालिकेची लागणारी प्रक्रिया आम्ही पार पडली तरी साधी मैदानाची साफसफाई देखील झाली नव्हती. या मैदानात सतत काहीं ना काही कार्यक्रम होत राहतात महापालिका या मैदानाच्या साफसफाई कडे दुर्लक्ष करते असेही तात्या माने यांनी सांगितले. पालिकेत जाब विचारण्यासाठी अखेर पक्षाच्या वतीने तात्या माने वैशाली दरेकर प्रतीक पाटील काळण भगत असे पदाधिकारी गेले होते. ही स्पर्धा आता रद्द करून पुढे ढकलली आहे असे ही माने यांनी सांगितले. निषेध म्हणून मेडल आणि पारितोषिक अधिकाऱ्यांना देऊन टाकण्यात आली असे माने यांनी सांगितले.
गणेश ठाकूर
डोंबिवली पत्रकार