‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिनला दिलासा! केरळ न्यायालयातील कार्यवाहीवर स्थगिती

0

तिरुवनंतपुरम -‘लॉटरी किंग’ सँटियागो मार्टिन विरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये केरळच्या पीएमएलए न्यायालयात सुरु असलेल्या कार्यवाहीवर सर्वोच्च न्यायालयाने काल स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मार्टिनला दिलासा मिळाला आहे. या खटल्याला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणासंदर्भात ईडीचे म्हणणे काय? त्याची माहिती मागवली. गेल्या काही दिवसांपासून मार्टिनच्या विरुद्ध केरळच्या पीएमएलए न्यायालयात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा खटला सुरु होता. सँटियागो मार्टिनच्यावतीने ज्येष्ठ वकील आदित्य सोंधी आणि वकील रोहिणी मुसा यांनी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. यावेळी ते म्हणाले, “पीएमएलए न्यायालयात एखादा खटला हस्तांतरित केल्यानंतर पूर्व-निर्धारित किंवा अनुसूचित गुन्ह्यांची प्राथमिक सुनावणी प्राधान्याने घ्यायला हवी का? असा प्रश्न याचिकेत उपस्थित करण्यात आला. यावर न्यायमूर्ती एएस ओका आणि उज्ज्वल भुईया यांनी नोटीस बजावली. दरम्यान, इलेक्टोरल बाँडची माहिती सार्वत्रिक झाल्यानंतर यामध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे नाव उघडकीस आले होते. यामध्ये सँटियागो मार्टिनचाही सहभाग होता.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech