पुणे – धैर्यशील मोहिते पाटील दोन दिवसात शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत शरद पवार गटात पक्षप्रवेश वाढत आहेत. जनमानसातलं स्थान लक्षात घेऊन पक्ष निर्णय घेत आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेचतली. अतुल देशमुख यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
संजय मंडलिक यांच्या वक्तव्यावर देखील शरद पवार यांनी वक्तव्य केले. राजघराण्यात दत्तक नवीन गोष्ट नाही. दत्तक झाल्यावर तो घराण्याचा प्रतिनिधी होतो. शाहु छत्रपती यांच्याबाबत जनतेमध्ये कृतज्ञता आहे आणि त्यांच्यावर टीका करणे, यातून विरोधकांची मानसिकता दिसून येते, असे शरद पवार म्हणाले. धैर्यशील मोहिते पाटील मला भेटून गेले आहेत. ते दोन दिवसात पक्षात प्रवेश करणार आहेत. सर्वांसोबत चर्चा करुन पक्ष निर्णय घेत असतो. कुणाशीही लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील भाष्य केले.
रामटेक येथील सभेत्या मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. यावर पवार म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची कितपत प्रतिष्ठा राखतायत हा प्रश्न मला पडतो. मोदी वगळता सर्व पंतप्रधानांनी विरोधकांचा सन्मान केला. लोकशाहीत विरोधकांना महत्व आहे आणि मोदी सांगतात एकही विरोधकांना निवडून देऊ नका. आज शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की पुतीन आणि नरेंद्र मोदी यात काहीच फरक नाही.