यंदाचे मराठी वाङ्‌मय परिषदेचे साहित्य संमेलन बडोद्याला

0

मुंबई: यंदाचे मराठी वाड्मय परिषदेचे ७४ वे साहित्य संमेलन पुढील महिन्यात ८ व ९ फेब्रुवारी दरम्यान बडोदा येथील महाराणी चिमणाबाई हायस्कूलच्या प्रांगणात होणार आहे. या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शुभांगिनीराजे गायकवाड यांच्या हस्ते होणार असून गुजरात विधानसभेचे मुख्य दंडक बाळकृष्ण शुक्ल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार, व्याख्याते व लेखक डॉ. उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होईल, अशी माहिती मराठी वाड्मय परिषद, बडोदेचे कार्यवाह संजय बच्छाव यांनी दिली.

रात्री आठ वाजता डॉ. आशिष मुजुमदार यांचा ‘गझल आख्यान’ कार्यक्रम होणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता ‘माध्यमे आणि साहित्य’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात प्रा. डॉ. वैभवी देहूकर,चंद्रशेखर अग्निहोत्री, प्रा.डॉ.गिरीश गायकवाड व पराग कर्वे सहभागी होणार आहेत. तर दुपारी साडेचार वाजता १४ ते ३० वयोगटातील तरुणाईचा सहभाग असलेले ‘युवा संमेलन’ होईल. यावेळी डॉ. निरगुडकर त्यांच्याशी संवाद साधतील. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता अधिवेशनाचा समारोप होईल. रात्री आठ वाजता प्रा.डॉ.मृदुला दाढे यांचा गीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech