मुंबई -हैद्राबाद : मंगेश तरोळे – पाटील
अखिल भारतीय कोळी समाज संघटना रजि दिल्ली यांची हैद्राबाद येथे दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यकारिणी मिटींग (शनिवार) १८ व (रविवार) १९ जानेवारी रोजी संपन्न झाली आहे. या दोन दिवशीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमाला देशभरातील विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी उपस्थित अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, गुजरात राज्य सरकार मंत्री कुवरजीभाई बावलिया यांनी विविध राज्यातील समस्या समजून घेत राष्ट्रीय कार्यकारीमध्ये विविध समित्या स्थापन समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी विविध ठरावांना मंजूरी देत राज्यातील समस्यांना केंद्र दरबारी मांडण्यासाचा प्रस्ताव तसेच पाठपुरावा घेण्याचे आश्वासन देत. राज्यातील संघटन बळकट करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये सुलोचना ठाणेकर यांच्या नावाने अखिल भारतीय कोळी समाज पुरस्कार ठरावही पास करण्यात आला. देशभरासह राज्या राज्यात सदस्य नोंदणी अभियान राबविण्याच्या येणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष केदारभाई लखेपुरीया यांनी यावेळी बोलतांना दिली.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मिटींगमध्ये महाराष्ट्राचा दबदबा काय ठेवण्यात महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केदार लखेपुरीयांना या यश मिळाले असून राष्ट्रीय कार्यकारिणी मिटींग मध्ये महाराष्ट्र राज्यातील कोळी समाजाच्या विविध समस्या मांडण्यात आल्या तसेच महाराष्ट्रातील तरूणांना रोजगार संबंधी समस्या राष्ट्रीय कार्यकारिणी समोर मांडण्यात आल्या. जातीच्या दाखल्याचे प्रश्न तसेच वैद्ता प्रमाणपत्रासाठी पाठपुरावा करण्यासासंदर्भात मागणीचा पाठपुरावा करण्याचा प्रस्ताव या मिटींगमध्ये ठेवण्यात आला. राज्यातील स्थानिक मच्छिमारांच्या विविध समस्यासह कांदळवन, समस्याही यावेळी मांडण्यात आला आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकामध्ये राज्यातील कोळी समाजाला प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी केंद्रीय समितीकडून राज्यातील प्रदेश कार्यकारिणीला सहकार्य मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य प्रभारी नेमून देण्यात आले. देशभरातील कोळी समाजाची संख्या लक्षात घेता, समाजात होणाऱ्या अन्यायाला बाजूला सारून समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक राज्यात बुथ लेव्हल कोळी समाज सदस्य नोंदणी अभियान राबूवन राज्यातील कोळी समाजाला प्रमुख नेतृत्वात आण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितले.
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मिटींगमध्ये महाराष्ट्राचे वर्चस्व कायम
अखिल भारतीय कोळी समाजाच्या संघटनेच्या वतीने कोळी समाजाचे मार्गदर्शक अखिल भारतीय कोळी समाज सरचिटणीस अॅडव्होकेट सचिनजी ठाणेकर यांच्या मार्गदर्शनाने राज्यातील आदिवासी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र तथा वैद्यता प्रमाणपत्र मिळवून देणे महत्वाचा विषयासह, मत्स व्यवसायावर असलेले दुष्काळाचे सावट उतरती कला ओळखून यावर उपाययोजना करणे, मुंबई परिसरातील मासळी बाजारातील अतिक्रमण, कोळीवाड्यातील जागांवर विकासंकाचे अतिक्रमण, कोळीवाडयांचे सिमांकन, हवामान बदलामुळे मासेमारीवर होणारे परिणाम चक्रीवाद आणि समुद्रकिनारी निर्माण होणारे धोके, कांदळवण नष्ट होण्याचे प्रश्नासह समुद्रातील वाढते प्रदूषण कोळी समाजासाठीचे महत्वाचे मुद्दे असतील. त्याशिवाय राज्यातील कोळी बांधवांना जात प्रमाणपत्रासह वैद्वता प्रमाणपत्र मिळण्यासह समाजातील वाढती बेरोजगारी सुद्धा समाजात मोठा प्रश्न असल्याने हया सर्व समस्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मिटींगमध्ये प्रामुख्याने घेण्यात आल्या. शिवाय राज्यात अखिल भारतीय कोळी समाजाच्या सुलोचनाताई ठाणेकर यांच्या समाज कार्यांचा सन्मान म्हणून राष्ट्रीय पुरस्कार घेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष केदार लखेपुरीया यांनी यावेळी बोलतांना दिली.