मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभाग दि. ०२.०२.२०२५ (रविवार) रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे. माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्ग सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.
सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान नियोजित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार नाही हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.